लाडक्या बहिणीला 1500 दिले तर कोर्टात गेले, आता सांगताय आम्ही तीन हजार हजार देऊ ; लबाडांवर विश्वास ठेवू नका : आमदार चित्रा वाघ

महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन


यावल (12 नोव्हेंबर 2024) : महाराष्ट्र राज्यात लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांना 1500 रुपये दरमहा दिले मात्र महाविकास आघाडीचे लोक थेट कोर्टात गेले आणि आता त्यांच्या जाहीरनाम्यात आम्ही तीन हजार रुपये देऊ असे सांगताय त्यामुळे हे लबाडांचे आमंत्रण आहे. तुम्ही दक्ष रहा, अशा शब्दात भाजपा महिला मोर्चाच्या राज्याध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावरच प्रश्न उपस्थित करीत टीका केली. यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरात आयोजित महिला मेळाव्यात बोलत होत्या.

अमोल जावळे यांना निवडून द्या
महायुतीचे रावेर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी सायंकाळी महिलांची जाहीर सभा झाली. भाजपा महिला मोर्चाच्या राज्य अध्यक्ष तथा आमदार चित्रा वाघ यांनी या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन केले. अमोल जावळे यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.


यांची होती उपस्थिती
सभेत भाजपा राज्य महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष जयश्री सोनवणे, डॉ.राजेंद्र फडके, केतकी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेश नेमाडे, महायुतीचे उमेदवार अमोल जावळे, भाजपा तालुकाध्यक्ष जयश्री चौधरी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष योगीता घोडके, शिवसेना तालुकाध्यक्ष पूजा पाटील, मिनाताई तडवी, जयश्री जावळे, रवींद्र नाना पाटील, यावलच्या माजी नगराध्यक्ष माधुरी फेगडे, रोहिणी फेगडे, पूनम पाटील, भारती पाटील, रावेर तालुकाध्यक्ष शिवसेना स्वाती भंगाळे, आशा सपकाळे सह महायुतीच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. या सभेत यावल शहर व तालुक्यातून हजारोंच्या संख्येत महिलांची उपस्थिती होती.

महिलांसाठी सक्षमीकरण योजना : जयश्री सोनवणे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचे प्रश्न हे जातीने सोडवले. यात प्रामुख्याने उघड्यावर शौचालयास जाणार्‍या महिलांना सन्मानाने शौचालयाची उपलब्ध करून दिले जे काम काँग्रेसचे 70 वर्षात केले नाही ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले तसेच महिला सक्षमीकरण साठी राज्याचे महायुती सरकार देखील काम करत आहे, असे जयश्री सोनवणे म्हणाल्या.

गरिबांचे कैवारी सरकार : अनेक आरोग्याच्या योजना सुरू
महायुतीचे सरकार हे गरिबांचे कैवारी सरकार आहे. या सरकारने विविध आरोग्याच्या योजना सुरू केल्या. यामध्ये अनेक रुग्णांच्या कर्करोगसह हृदयरोगाच्या देखील मोफत शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. सर्वसामान्यांच्या आरोग्याचे हित जोपासणारे हे सरकार आहे. या सरकारच्या विविध योजनांचा दिलासा सर्वसामान्यांना मिळाल्याचे डॉ.सरोदे म्हणाले.

चित्रा वाघ यांची चौफेरी फटकेबाजी
ज्या भावांनी तुम्हाला सन्मान दिला आत्मनिर्भर केलं त्या भावाच्या पाठीशी उभे रहा, असे सांगत प्रत्येक महिलांना मी एक कानमंत्र देत आहे तो कानमंत्र आपल्या पतीला सांगा असे सांगत आमदार वाघ यांनी महिलांना खा कोणाचेही मटण मात्र, दाबा कमळचे बटन. असे सांगितल्यानंतर एकच हश्शा पिकला.

प्रतिमा स्वच्छ त्यामुळे चिखलफेक होण्याची शक्यता :अमोल जावळै
शेळगाव बॅरेज प्रकल्प हा शेतकर्‍यांसाठी वरदान ठरला आहे. विकासाची बांधीलकी आहे. आपली स्वच्छ प्रतिमा असून माझ्या विरोधात विरोधकांकडे काहीही नाही म्हणून आगामी काळात कदाचित ते माझ्यावर काही ही चिखलफेक करू शकतात, असे प्रसंगी उमेदवार अमोल जावळे यांनी संवाद साधताना सांगितले. प्रचंड मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !