मतदानरुपी आशिर्वाद देण्याचे यावल तालुक्यातील मतदारांना केले धनंजय चौधरींनी आवाहन


रावेर (12 नोव्हेंबर 2024) : विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी सोमवार, 11 रोजी यावल शहर, अंजाळे, वाघळूद या परिसरात आपला प्रचार दौरा केला.

विकास पर्वाला सुरूवात करण्यासाठी साथ द्या : धनंजय चौधरी
यावेळी यावल तालुक्यातील यावल शहर, अंजाळे, वाघळूद यासह परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला. आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून यावल ते फैजपूर रस्ता डांबरीकरण यावल ते भुसावळ रोडवरील काँक्रीटीकरण व अंतर्गत रस्ते डांबरीकरण,काँक्रीटीकरण पेव्हर ब्लॉक, इ मुलभुत सुविधांची कामे झालेली आहेत मतदारसंघात पुन्हा नव्याने विकास पर्वाला सुरुवात करण्यासाठी या निवडणुकीत माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून मतदानरुपी आशिर्वाद देण्याची ग्रामस्थांना विनंती केली.


यांची होती उपस्थिती
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य शेखरदादा पाटील, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हाजी छब्बीर शेठ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुकेश येवले, काँग्रेस रावेर लोकसभा कार्याध्यक्ष भगतसिंग बापू पाटील, यावल माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, राकेश कोलते, शरद कोळी, शिवसेना शहराध्यक्ष जगदीश कवडीवाले, काँग्रेस शहराध्यक्ष कदीर खान, हाजी इकबाल खान, माजी नगरसेवक युनूस शेठ, अस्लम मेम्बर, मनोहर सोनवणे, संतोष खर्चे, पप्पू जोशी, कडू पाटील, विवेक अडकमोल, हसन तडवी, बारी समाज पंच मंडळ अध्यक्ष दगडू बारी,बशीर तडवी, हाजी गफ्फार शहा,संदीप भैय्या सोनवणे,राजेशदादा करांडे,कामराज घारु,बोडदे नाना, अरुण लोखंडे, अजय बढे,विक्की गजरे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !