माजी आमदार संतोष चौधरी उद्या मेळाव्यात राजकीय भूमिका जाहीर करणार


भुसावळ (13 नोव्हेंबर 2024) : भुसावळ विधानसभा निवडणुकीत प्रचारापासून अंतर ठेवून असलेले माजी आमदार संतोष चौधरी हे गुरुवार, 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात आपली भूमिका जाहीर करणार आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल राधाकृष्ण येथे सकाळी 10 वाजता चौधरी यांनी कार्यकर्ता व पदाधिकार्‍यांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे.

संतोष चौधरी कार्यकर्त्यांनी विचारून भूमिका जाहीर करणार
माजी आमदार चौधरी हे गुरुवारी सकाळी 10 वाजता आयोजित मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असून त्यानंतर ते आपली निवडणुकीतील राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह माजी नगरसेवकांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !