जळगावच्या पर्यटकांना सातपुडा जंगल सफारीत वाघाचे दर्शन
Tourists of Jalgaon get sight of tiger in Satpura Jungle Safari रावेर (13 नोव्हेंबर 2024) : जळगाव येथील पर्यटक सातपुडा जंगल सफारीसाठी आल्यानंतर त्यांना जंगल सफारी दरम्यान प्रथमच वाघाचे दर्शन निसर्गरम्य वातावरणात झाले. जळगाव शहरातील काही पर्यटक सातपुडा जंगल सफारीसाठी आल्यानंतर त्यांनी रावेर वनक्षेत्रातील नियतक्षेत्र गारबर्डी, लोहारा, कुसुंबा क्षेत्रात सकाळी सात वाजेपासून जंगल सफारीला सुरुवात केली. सुरुवातीलाच मोर, लांडोर यांचा ग्रुप दिसून आला. पुढे शिकारी पक्षी वाईहिट आय बाजड व सिरकीर मालकोवा पक्षी दिसून आलेत. त्यानंतर साधारण आठ वाजेच्या सुमारास सफारी रस्त्याने रुबाबात चालत असणारा बिबट दिसून आला व त्यापासून पाच ते सहाशे मीटर अंतरावर सातपुडा जंगल सफारीत प्रथमच वाघोबाचे दर्शन झाले.
निसर्गरम्य जंगलात
पर्यटकांना निसर्गरम्य सफरीत श्री पावर गंगोत्री धबधबा, चिंचाटी धरण, अंजन कुटी, बांबू कुटी, नेकलेस पॉईंट, सातपुडा व्हिव पॉईंटचे दर्शन घडल्यानंतर त्यांनी त्यांचे विहंगम दृश्य मोबाईलमध्ये टिपले. पर्यटकांच्या मते जळगाव जिल्ह्यातील पाल हे हिमालय, शिमला, उत्तराखंडची अनुभूती देते. या भागातील जंगल निसर्गरम्य असून या परिसरात पर्यटकांची कमतरता आहे.

ताडोबा जंगलाची होते आठवण
अंजन मचनावरून पाहिलेले चिंचाटी धरण परिसर ताडोबा जंगलाची आठवण करून देते तसेच 150 ते 200 फूट अंतरावरून पडणारे गंगोत्री धबधब्याचे पाणी दुध सागरासारखे दिसते. यावल वन विभागातील सातपुडा जंगल सफारी करून मला व माझ्या सहकार्यांना खूप आनंद मिळाला. सातपुडा जंगल सफारी आज केली यात पहिल्याच सफारीत मला वाघ आणि बिबट पाहवयाला मिळाले म्हणून खूप आनंद झाला या व्यतिरिक्त नैसर्गिक दृश्य विलोभनीय आहेत. भविष्यात या सातपुडा जंगल सफारीचा परिसर नक्कीच नावरुपाला येईल यात शंकाच नाही, असे मत पर्यटकांनी व्यक्त केले.
स्थानिकांना रोजगार मिळेल
यावल वनविभाग अंतर्गत रावेर वनक्षेत्रातील सातपुडा जंगल सफारीचे काम अंतिम टप्प्यात असून पर्यटकांना जंगल सफारीत वाघ, बिबट दिसणे ही आनंदाची गोष्ट आहे. भविष्यात सातपुडा जंगल सफारी पर्यटकांना आकर्षीत करेल व स्थानिक पातळीवर शाश्वत रोजगार निर्मिती होईल, असे यावल
उप वनसंरक्षक जमीर शेख म्हणाले.




