आमदार मंगेशदादा चव्हाणांची भरघोस विकासकामे माझ्या मतदारसंघात दाखवली तर मलादेखील निवडून येण्यास अडचण ! : चाळीसगावात गृहमंत्री अमित शहांची स्पष्टोक्ती


चाळीसगाव (13 नोव्हेंबर 2024) : चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेली कामे कौतुकास्पद आहे. तब्बल दोन हजार तीनशे कोटी रुपयांची कामे एका मतदारसंघात आमदार मंगेशददा यांनी केल्याची बाब उल्लेखनीय बाब आहे. त्यांच्या केलेल्या कामाची यादी माझ्या मतदारसंघात दाखवली तर मला माझ्या मतदारसंघात मला निवडून यायला अडचण होईल, अशी मिश्किल टीप्पणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चाळीसगावातील प्रचार सभेत केली. आमदार मंगेशदादा चव्हाण व महायुतीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ चाळीसगावात बुधवारी अमित शहा यांची प्रचार सभा झाली.

महाविकास आघाडीला मतदार घरी बसवणार
अमित शहा यांनी भाषणाची सुरुवात युवा मित्रांनो राम राम’ म्हणून करीत श्री क्षेत्र पद्मालयातील श्री गणेश व पाटणादेवीच्या चंडिका देवी यांना प्रणाम म्हणत चाळीसगावचे गणित तज्ञ भास्कराचार्य व के.की. मूस यांनाही अभिवादन केले. निवडणुकीचा निकाल पाहायचा असेल तर 23 तारखेला महाविकास आघाडीला नागरिक घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत, असे ते म्हणाले. महायुती सरकार बनल्यापासून उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक कमी झाल्याचे जे म्हणत आहे ते त्यांच्या काळातील गोष्टी सांगत असून आज एफडीआयमध्ये देशात महाराष्ट्र नंबर वन आहे. भाजपाच्या काळात विकासाची कामे झाली होती, ती आघाडी सरकारने विकासाची कामे बंद केली होती.

हल्ले होताच सर्जिकल स्ट्राईक
तुमचे एक मत मंगेश चव्हाण यांना आमदारच बनवणार नाही तर लाडक्या बहिणीच्या खात्यावर 2100 रुपये व शेतकर्‍यांच्या खात्यात 12 हजार ऐवजी 15 हजार देण्याचे काम करेल. देशात काँग्रेसचे सरकार दहा वर्षे होते, त्यावेळेस आतंकवादी भारतात येऊन बॉम्बस्फोट करून जात असताना पावले उचलली गेली नाहीत मात्र नरेंद्र मोदी सरकारच्या काळात पुलवामा व इतर घटना झाल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करून उत्तर देण्यात आल्याचे अमित शहा म्हणाले.

वारकरी वेषभूषेत अमित शहांचा नागरिकांशी संवाद
केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा चाळीसगावात वारकरी फेटा, विना व चिपाळ्या देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर वारकरी वेशभूषा परिधान करून त्यांनी नागरिकांना संबोधित केले.

आमदार मंगेशदादा विकासाचे शिल्पकार
आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावमध्ये गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणून चाळीसगावचा विकास केल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगत त्यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार किशोर पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व जिल्ह्यातील महायुतीचे इच्छूक उमेदवार उपस्थित होते.


कॉपी करू नका.