रोहिणी खडसे यांना गावा-गावातील मतदारांकडून मिळतोय प्रतिसाद


बोदवड (14 नोव्हेंबर 2024) : गावागावात आकर्षक रांगोळी, फुलांची उधळण, ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने महाविकास आघाडीच्या उमेदवार अ‍ॅड.रोहिणी खडसे यांचे स्वागत केले जात आहे. समाजाच्या सर्व स्तरातून भेटत असलेला प्रतिसाद बघता मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा विजयाचा दावा मजबुत होताना दिसत आहे.

अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यातील पळासखेडा, मुक्तळ, वाकी बोरगाव, वराड, सुरवाडे खु, सुरवाडे बु, मानमोडी, जलचक्र तांडा, जलचक्र खु, जलचक्र बु या गावांमधे प्रचार फेरी काढून ग्रामस्थांशी संवाद साधत आपल्या तुतारी वाजणारा माणूस या निशाणी समोरील बटण दाबुन मतदानरूपी आशिर्वाद देण्याची विनंती केली.

ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
यावेळी सर्व गावांमध्ये त्यांना ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या शेतकर्‍यांच्या शेतीला पाणी, शेतमालाला योग्य दाम , तरुणांच्या हाताला काम, महिला सुरक्षितता आणि सक्षमीकरण, गोरगरिबांना शिक्षण आणि आरोग्य सेवा, मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आ. एकनाथराव खडसे, रविंद्र भैय्यासाहेब पाटील, अरुण दादा पाटील, उदय दादा पाटील आणि ज्येष्ठ नेत्यांचा मार्गदर्शनाखाली लढत असलेल्या या निवडणुकीत आपले मतदानरूपी आशीर्वाद देऊन सेवेची संधी देण्याची रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थांना विनंती केली

गावांना डांबरी रस्त्यांनी जोडले : अजयसिंग पाटील
यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना वराड सरपंच पती अजयसिंह पाटिल म्हणाले आ.एकनाथराव खडसे यांनी बोदवड तालुक्याची निर्मिती करून सर्व शासकीय कार्यालये बोदवड येथे आणली त्यामुळे नागरिकांना शासकीय कामासाठी भुसावळ जाण्याचा त्रास वाचला. नाथाभाऊ यांनी प्रत्येक गावाला डांबरी रस्त्याने जोडले प्रत्येक गावांमधे अंतर्गत रस्ते, अंगणवाडी वर्ग खोल्या,सामाजिक सभागृह, बुद्ध विहार अशा विविध मुलभूत सुविधांचे निर्माण केले याशिवाय बोदवड तालुक्याला नवसंजीवनी देणार्‍या बोदवड उपसा सिंचन योजनेची मुहूर्तमेढ रोवली या योजनेमुळे शेतकरी सुखी समृध्दी होइल असा जनसेवेचा ध्यास घेतलेल्या एकनाथराव खडसे यांचा विकासाचा वसा वारसा ड रोहिणी खडसे या पुढे नेत असुन राहिलेले विकास कामे पुर्ण करण्यासाठी , बोदवड उपसा योजना पूर्णत्वास नेऊन शेतीच्या बांधावर पाणी आणण्यासाठी रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे आवाहन अजय सिंह पाटिल यांनी केले.

नाथाभाऊंच्या काळात सर्वांगीण विकास
यावेळी मतदारांशी संवाद साधताना बाजार समिती माजी संचालक रामदास पाटील म्हणाले तिस वर्षाच्या आमदार मंत्री पदाच्या कारकिर्दीत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करताना आ.एकनाथराव खडसे यांनी जाती पातीच्या राजकारणाला थारा दिला नाही सर्व जाती धर्म समूहाला नेतृत्वाची संधी दिली. मराठा समाजातील कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सहकारी संस्थामध्ये नेतृत्वाची संधी देऊन सन्मान केला. मराठा आरक्षणावरही त्यांनी आपली सकारात्मक भुमिका मांडून सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात आपले स्पष्ट मत विधानसभा आणि विधान परिषदेत मांडले होते.

नाथाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय तालमीत वाढलेल्या ड. रोहिणी खडसे या उच्चशिक्षीत असुन जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या आक्रमक नेत्या असुन त्यांना विकासाचे व्हिजन आहे त्यामुळे नाथाभाऊ आणि रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांचे हात बळकट करण्यासाठी रोहिणी खडसे यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन रामदास पाटील यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आबा पाटील मतदारांशी संवाद साधताना म्हणाले गेल्या निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा अल्प मतांनी पराभव झाला परंतु पराभवाने खचुन न जाता त्या गेले पाच वर्ष सतत आपल्या संपर्कात राहील्या .आपल्या प्रत्येक हाकेला साद देत आपल्या सुख दुःखात धावून आल्या.

विद्यार्थ्यांची बसची समस्या असो तरुणांचे, महिलांचे काही प्रश्न असो रोहिणी खडसे सदैव सेवेत हजर राहिल्या जेव्हा जेव्हा शेतकर्‍यांवर नैसर्गिक आपत्ती आली सर्व प्रथम रोहिणी ताई शेतकरी बांधवांना धिर देण्यासाठी शेतीच्या बांधावर हजर राहिल्या शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्यांनी शासन दरबारी यशस्वी पाठपुरावा केला.

शेतकरी, कष्टकरी,महिला,तरुण, विद्यार्थी सर्वांच्या प्रश्नांची जाण असणार्‍या आणि ते प्रश्न सोडवण्याची धमक आणि तयारी असणार्‍या रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष आबा पाटील यांनी केले

यावेळी गावागावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उबाठा पक्ष महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


कॉपी करू नका.