आमदार संजय सावकारेच पुन्हा होणार विजयी ! : वरणगाव भागात कार्यकर्त्यांचा विश्वास


भुसावळ (14 नोव्हेंबर 2024) : भुसावळ विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे हे सलग चौथ्यांदा निवडणूक रिंगणात असून या निवडणुकीत ते प्रचंड बहुतांनी विजयी होतील, असा विश्वास वरणगाव भागातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी प्रचार रॅली दरम्यान व्यक्त केला. यावेळी आमदार सावकारे यांचे फटाक्यांची आतषबाजी करीत स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांनी आमदारांचे औक्षण करीत त्यांना आशीर्वाद दिले.

यांची होती उपस्थिती
गुरुवारी सकाळी आमदार संजय सावकारे यांची प्रचार फेरी निघाली. यावेळी ठिकठिकठिकाणी आतषबाजी केल्यानंतर महिलांनी आमदारांचे औक्षण करीत त्यांना आशीर्वाद दिले. वरणगावातील रामपेठ प्रचारादरम्यान आमदारांनी विकासकामांसाठी कटीबद्ध असल्याची यावेळी ग्वाही दिली.


या प्रचार रॅलीत आमदारांसह भुसावळचे उद्योजक व माजी नगरसेवक मनोजबियाणी भाजपाचे भुसावळ तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, दुध संघ संचालक अतुल झांबरे, गोलू पाटील, स्थानिक महायुतीतील नगरसेवक, पदाधिकारी, विविध समाजातील नागरिक व महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन
गुरुवारी अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधूनप भुसावळ शहरातील भारत मेडिकलजवळ आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी एससी मोर्चा प्रांतीय अध्यक्ष लालसिंग हारिया, मनोज बियाणी, युवराज लोणारी, सर्व नगरसेवक आदींची उपस्थिती होती.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !