भुसावळात विकासकामांमुळे संजूभाऊ सावकारेच होणार आमदार ! : प्रभाग क्रमांक दहामधील रॅलीत कार्यकर्त्यांचा विश्वास
भुसावळ (14 नोव्हेंबर 2024) : भुसावळ विधानसभेच्या आखाड्यात उतरलेले आमदार संजय सावकारे हे शांत, संयमी व्यक्तिमत्व असून गत काळात त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केल्याने जनतेचा आशीर्वाद निश्चितपणे त्यांच्या पाठीशी असेल व या निवडणुकीत ते भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास महायुतीतील पदाधिकार्यांनी प्रभाग क्रमांक दहामध्ये आयोजित प्रचार रॅलीत गुरुवारी सायंकाळी व्यक्त केला.
विठ्ठल दर्शनाने प्रचाराला सुरूवात
गुरुवारी सायंकाळी सव्वापाच वाजता शहरातील विठ्ठल मंदिरातील जागृत विठ्ठल मंदिरापुढे आमदारांनी नतमस्तक होवून श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरूवात केली. यावेळी परिसरातील वयोवृद्धांचे त्यांनी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.
ढोल-ताशांचा गजर अन् फुलांची उधळण
प्रचार रॅलीत ढोल-ताशांचा गजर होत असताना नागरिकांकडून आमदारांवर फुलांची उधळण करण्यात आली तसेच सुवासिनींनी आमदारांचे औक्षण करीत त्यांना आशीर्वाद दिले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. शहरात कोट्यवधींची विविध विकासकामे केल्यामुळे आमदार संजय सावकारे यांनाच आशीर्वाद मिळून ते फिक्स आमदार होतील, असा आशावाद यावेळी बिल्डर चंद्रशेखर अत्तरदे यांनी व्यक्त केला.
या भागातून निघाली प्रचार रॅली
शहरातील विठ्ठल मंदिरापासून जनता बँक, झांबरे गल्ली, बँक ऑफ महाराष्ट्र, प्रा.दिनेश राठी यांच्या घरासमोरून मोठे हनुमान मंदिर, राम मंदिर, तेली गल्ली, भजिया गल्ली, ओसवाल पंचायतवाडा मार्गाने पंचशील नगरापर्यंत प्रचार रॅली निघाली. रॅलीचे मतदारांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
यांचा प्रचार रॅलीत सहभाग
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, उद्योजक मनोज बियाणी, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक प्रा.दिनेश राठी, उद्योजक मनोज बियाणी, अॅड.बोधराज चौधरी, पिंटू ठाकूर, पिंटू कोठारी, गिरीश महाजन, निक्की बत्रा, बिल्डर चंद्रशेखर अत्तरदे, डॉ.मोहन फालक, वासूभाऊ बोंडे, संजय नाहाटा, सुहास फालक, रमण भोळे, अजय भोळे, गजूभाऊ भारंबे, गोटूभाऊ लाहोटी, कल्पेश नाहाटा, अक्षय वर्मा, संजय चांडक, राजूभाऊ पारीख, मनीष महाजन यांच्यासह विविध समाजातील नागरिक तसेच महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.