भुसावळात आमदार सावकारे यांच्या विजयासाठी सौभाग्यवती मैदानात !
हजारो महिलांच्या सहभागाने निघालेल्या प्रचार रॅलीने विजयाचा विश्वास
भुसावळ (14 नोव्हेंबर 2024) : भुसावळचे आमदार संजय सावकारे हे सलग चौथ्यांदा निवडणूक रिंगणात असून त्यांच्या विजयासाठी त्यांच्या सौभाग्यवती सौ.रजनी संजय सावकारे यादेखील आमदारांच्या प्रचारासाठी झटत आहेत. भुसावळातील हजारो महिलांनी स्वयंस्फूर्तीने आमदारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी काढलेल्या रॅलीनंतर आमदार सावकारेच विजयी होतील, असा विश्वास रजनी सावकारे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
सौभाग्यवतींनी खोचला पदर : विजयासाठी महिलांची एकजूट
आमदार सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनी सावकारे या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात व आता विधानसभा निवडणुकीमुळे पतीच्या विजयासाठी त्यांनीदेखील पदर खोचला आहे. गुरुवारी दुपारी चार वाजता हजारो महिलांच्या सहभागाने ढोल-ताशांच्या गजरात प्रचार रॅलीला सुरूवात करण्यात आली.
आमदारांच्या विजयाचा विश्वास
आमदार संजय सावकारे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुखवटा तसेच कमळ दर्शवणारे कट आऊट प्रचार रॅलीत लक्ष वेधून घेत होते. यावेळी महिलांनी देखील यंदाच्या निवडणुकीत आमदार संजय सावकारेच विजयी होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
या भागातून प्रचार रॅली
शहरातील संतोषी माता हॉलपासून दुपारी सव्वा चार वाजता सुरू झालेली प्रचार रॅली आनंद नगर, जामनेर रोड, ब्राह्मण संघ, सराफ बाजार, मरिमाता मंदिर, मॉडर्न रोड, जनता गॅलरी, बाजारपेठ पोलीस ठाणे, गांधी पुतळा, यावल रोड, प्रभाकर हॉलजवळ पोहोचल्यानंतर तिचा समारोप झाला. ढोल-ताशांच्या गजरातील या रॅलीने जनतेचे लक्ष वेधले.
एक हजारांवर महिलांचा सहभाग
प्रचार रॅलीत प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे, माजी नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे, डॉ.मृणाल पाटील, डॉ.सुवर्णा गाढेकर, स्मिता फालक, वैशाली महाजन, कविता कोठारी, माजी नगरसेविका मीना लोणारी, डॉ.संगीता बियाणी, पिंकेथॉनच्या माधुरी गुजर, सुनीता पाचपांडे, अनिता महाजन, जयश्री लढे, ग्रामीण भागातील सरपंच तसेच पदाधिकारी महिला, भाजपाच्या माजी नगरसेविका, दुध संघ संचालिका श्यामल झांबरे, माजी सभापती प्रीती पाटील, मनीषा पाटील, वंदना उन्हाळे आदींसह शहरातील महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या.