महायुतीचे सरकार येण्यासाठी अमोल जावळे यांना निवडून द्या : मंत्री रक्षाताई खडसे
रावेर (15 नोव्हेंबर 2024) : राज्यात महायुतीचे सरकार येण्यासाठी महायुतीचे रावेर विधानसभेतील उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांना प्रचंड मताधिक्क्यांनी विजयी करा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची रावेर तालुक्यातील मोरगाव खुर्द व वाघोड नुकत्याच दिलेल्या भेटीदरम्यान केले.
मतदारांशी साधला संवाद
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 अनुषंगाने रावेर लोकसभा अंतर्गत रावेर विधानसभेसाठी भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी रावेर तालुक्यातील मोरगाव खुर्द येथे भेट देऊन मोरगाव खुर्द, खिरवड, नेहता, दोधे व अटवाडे तसेच वाघोड येथे भेट देऊन वाघोड, तामसवाडी, बोरखेडा व कर्जोद या गावातील भाजपा शक्ती केंद्र प्रमुख, बुथप्रमुख, महायुती पदाधिकारी तसेच मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला व प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महायुती सरकार स्थापन करण्यासाठी महायुती उमेदवार अमोल जावळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.





