केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची आज वरणगावात प्रचार सभा

महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ होणार सभा


भुसावळ (16 नोव्हेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील हे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. भुसावळ विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा शनिवार, 16 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता तिरंगा सर्कल येथे होणार आहे.

भाजपा पदाधिकार्‍यांकडून उपस्थितीचे आवाहन
महायुतीतील सर्व पदाधिकार्‍यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन महायुतीतील पदाधिकार्‍यांसह उद्योजक मनोज बियाणी, भाजपा तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, शहराध्यक्ष सुनील माळी, माजी सभापती राजेंद्र चौधरी व पदाधिकार्‍यांनी केले आहे.


रावेरचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचारार्थ छोरीया मार्केटमध्ये सभा
रावेर : केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची शनिवार, 16 रोजी दुपारी चार वाजता रावेरातील छोरीया मार्केट येथे महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. रावेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेला मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे उपस्थित राहणार आहेत.

महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या पदाधिकार्‍यांकडून करण्यात आले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !