झाशी हादरले : नवजात शिशु अतिदक्षता विभागात आगीत दहा मुलांचा मृत्यू
नवी दिल्ली (16 नोव्हेंबर 2024) : शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत दहा मुलांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात शुक्रवार, 15 रोजी घडली. या घटनेत 16 जण गंभीर जखमी झाले आहे.
37 मुलांना सुखरूप बाहेर काढले
अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून 37 मुलांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेनंतर आज सकाळी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी जिल्हाधिकार्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जखमी मुलांवर उपचार सुरू असून आर्थिक मदत करण्यासही सरकार तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले, नवजात बालकांचा मृत्यू हा अत्यंत दुर्दैवी आहे. कुटुंबीयांसोबत आम्ही नवजात बालकांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत. प्राथमिक तपास प्रशासकीय पातळीवर केला जाईल, जो आरोग्य विभाग करेल, त्यानंतर पोलीस चौकशी करणार आहेत. यामध्ये अग्निशमन विभागाची टीमही सहभागी होणार आहे. तर तिसरी चौकशी म्हणजे जिल्हाधिकार्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.