सिंचनासाठी महाकाय मेगा रिचार्ज प्रकल्पाचे काम मार्गी लावणार

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील : रावेरात अमोल जावळे यांच्या प्रचारार्थ सभा


रावेर (16 नोव्हेंबर 2024) : रावेर तालुक्यातील जमीन सुपीक असून पिकांसाठी पाण्याची गरज आहे. रावेरसह परिसरासाठी महत्त्वाचा तापी मेगा रिचार्ज प्रकल्पावर टेक्निकल काम सुरू आहे. लवकरच महाकाय मेगा रिचार्ज प्रकल्पाचे काम मार्गी लावणार आहे. असे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्यात महायुतीचे डबल इंजिन सरकार निवडून आणा. त्यासाठी महायुतीतील भाजपचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांना विजयी करावे, असे आवाहन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी केले. रावेर विधानसभेतील महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचारार्थ शनिवारी रावेरात प्रचार सभा झाली.

काँग्रेसला संधी दिल्यास लाडकी बहिण योजना बंद होणार
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील म्हणाले की, डबल इंजिनचे सरकार असून गुजराथ हे विकासाचे मॉडेल आहे. केंद्र सरकारमुळे विकास होत असून महाराष्ट्रात ही विकासासाठी महायुतीचे सरकार पाहिजे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षात राज्य विकासात मागे पडला. काँग्रेसने सत्तेत असताना भ्रष्टाचार करून देशाचा सत्यानाश केला. मतदार संघाच्या विकासासाठी भाजपला विजयी करा, असे आवाहन करीत त्यांनी काँग्रेसला संधी दिल्यास महिलांची लाडकी बहिण योजना बंद होईल. विकासाचा अडसर ठरणार्‍यांना निवडणुकीत बाजुला सारा. 30 ते 40 हजार कोटींचा मेगा रिचार्ज प्रकल्पावर टेक्नीकल काम सुरू आहे. अअटल भुजल योजने अंतर्गत गावातील पाणी गावात शेतातील पाणी शेतात जिरवण्यात येईल, असेही ते म्हणाले.


मतदारांविषयी तळमळ आमदार असावा
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की सुबत्ता असलेल्या तालुक्यात मतदारांची तळमळ असणारा आमदार हवा. केंद्रात भाजप व राज्यात भाजप सरकार आल्यास फ्लड कॅनॉल योजना मार्गी लागेल. महायुतीचे शासन आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये 15 हॉर्स पॉवर पंपाची वीज माफ करणार असून गरिबांना धान्य मोफत, तीन गॅस सिलेंडर, मोफत घरे तसेच महिलांसाठी एस.टी.बस निम्मे तिकिट, लाडकी बहीण योजना, महिलांच्या सबलीकरण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने योजना आणल्याचे ते म्हणाले.

सर्व घटकांपर्यंत योजना पोहोचल्या
केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, रावेर मतदारसंघाचा महाविकास आघाडीच्या कार्यकाळात झाला नाही. अनेक समस्या आहेत. महाविकास आघाडीने केळी पीक विमा संदर्भात दखल घेतली नाही. मेगा रिचार्जचा प्रकल्प लवकर सुरू करावा. सिंचनाच्या योजनांसाठी जलशक्ति मंत्री सी.आर.पाटील यांनी पुढाकार घ्यावा. भाजप जातीयवादी नाही. मुस्लीम हिंदू सर्व समाज घटकापर्यंत योजना पोहोचल्या आहेत.

यांची सभेला होती उपस्थिती
परिवहन मंत्री मुकेश पटेल, आमदार जिग्नेश पटेल, बेटी बचाव बेटी पढावचे संयोजक राजेंद्र फडके, भाजप प्रदेश सदस्य सुरेश धनके, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रंजना पाटील, पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, सुनील पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील, बाजार समिती सभापती सचिन पाटील, संचालक गणेश महाजन, जयेश कुयटे, मिलिंद वायकोळे, महेश चौधरी, वाय.व्ही.पाटील, प्रवीण पंडीत, दिलीप पाटील, नितीन पाटील, उमेश महाजन, माजी नगराध्यक्षा रंजना अकोले, उमाकांत महाजन यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक पद्माकर महाजन तर सूत्रसंचलन वासुदेव नरवाडे यांनी केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !