रेल्वे प्रवाशांना दिलासा : छपरा-एलटीटी एक्स्प्रेस रविवार, सोमवारी धावणार


भुसावळ (17 नोव्हेंबर 2024) : दिवाळीसह छटपूजा उत्सव आटोपल्यानंतर मुंबईकडे येणार्‍या चाकरमान्यांची गर्दी वाढल्याने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा विशेष गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या रेल्वें गाडीला भुसावळ, जळगाव रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.

असे आहे गाडीचे वेळापत्रक
रेल्वे क्रमांक 05113 छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस उत्सव विशेष गाडी रविवार, 17 नोव्हेंबर रोजी छपरा येथून 5.30 वाजता सुटेल. दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजता भुसावळ तर 9.33 वाजता जळगावला थांबा घेवून लोकमान्य टिळक टर्मिनसला सायंकाळी 5.30 वाजता पोहोचणार आहे तसेच रेल्वे क्रमांक 05114 लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा उत्सव विशेष गाडी सोमवार, 18 नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनवरून रात्री 8.15 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 2.45 वाजता जळगाव तर भुसावळला 3.30 वाजता पोहोचणार आहे. यानंतर तिसर्‍या दिवशी दुपारी 12.50 वाजता छपरा स्थानकावर पोहोचेल. या विशेष रेल्वेमध्ये चार सामान्य बोगी, चार स्लीपर बोगी, 12 वातानुकूलित थर्ड इकॉनॉमी डबे आहेत. एकूण 22 डबे या गाडीला असतील. ही गाडी विभागात खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.


कॉपी करू नका.