भुसावळातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये आज आमदार संजय सावकारे यांचा प्रचार दौरा
भुसावळ (17 नोव्हेंबर 2024) : महायुतीतील भाजपाचे आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये रविवार, 17 रोजी दुपारी चार वाजता प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. स्वामी नारायण मंदिरापासून प्रचार दौर्याला सुरूवात होणार आहे
सहभागाचे आवाहन
प्रचारात भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी, शहराध्यक्ष युवराज लोणारी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे यांनी केले आहे.





