भुसावळातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये आमदार संजय सावकारे यांचे जेसीबीद्वारे फुलांच्या वर्षावात स्वागत !
प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद : सुवासिनींनी औक्षण करीत दिल्या शुभेच्छा
भुसावळ : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. प्रचार रॅलीचे प्रभागात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. शंभूराजे ग्रुपतर्फे पाच जेसीबीद्वारे आमदारांवर फुलांची उधळण करीत त्यांचे अत्यंत उत्त्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. जागोजागी लाडक्या बहिणींनी औक्षण करीत आमदारांना आशीर्वाद दिला तर उत्तर भारतीयांनी त्यांना पाठिंबा दर्शवला.
स्वागताने आमदार भारावले
आमदार संजय सावकारे यांच्या प्रचार रॅलीला गांधी नगरातून सुरुवात झाल्यानंतर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करीत आमदारांचे स्वागत करण्यात आले तसेच सुवासिनींनी औक्षण करीत त्यांना आशीर्वाद दिले. शंभू राजे ग्रुप व गौरव आवटे मित्र परिवाराच्या वतीने पाच जेसीबीतून फुलांच्या वर्षावात आमदारांचे स्वागत करण्यात आले.
या भागातून निघाली रॅली
माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्या गांधी नगरातील घरापासून रॅलीला सुरूवात झाल्यानंतर फालक नगर, सरस्वती नगर, गुंजाळ कॉलनी, लक्ष्मी नगर, गडकरी नगर, शिवदत्त नगर, प्रल्हाद नगर, गुजर कॉलनी, रिंग रोड, शंभू राजे चौक, महाकाल चौक आदी भागातून प्रचार रॅली काढण्यात आली.
यांचा प्रचार रॅलीत सहभाग
प्रभाग क्रमांक 13 चे माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, उद्योजक मनोज बियाणी, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव राजेंद्र आवटे, हॉटेल खालसा पंजाबचे संचालक सारंगधर (छोटूभाऊ) पाटील, युवा मोर्चा खजिनदार मनीष सारंगधर पाटील, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष गुड्डू शेठ अग्रवाल, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखर अग्रवाल, भाजपा उत्तर भारतीय आघाडी जिल्हाध्यक्ष राजेश यादव, उत्तर भारतीय आघाडी भुसावळ शहराध्यक्ष वेदजी ओझा, वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष नरेंद्र भैय्या यादव, रवींद्र लेकूरवाळे, सुनील पाटील, लाजरस मनी, अंकुश वावरे, जितेंद्र डहाके, सुनील पाटील, शिव कैथवास, किशोर टोके, भाजपा वॉर्ड अध्यक्ष संध्याताई चंदेल तसेचयोगेश वाघ, अंकुश वावरे, संदीप यादव, गौरव वाघ, मोेंटू अग्रवाल, आकाश अग्रवाल,अंकुश पाटील, रवी शुक्ला, प्रल्हाद पवार, आर.आर.उपाध्ये, सुधीर ओझा सर, निगम सर, कृष्णकुमार लोधी, प्रमोद सिंग, लाजरस मणी यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.