चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई : गावठी कट्टा आणि जिवंत काडतूसांसह दोन आरोपी जाळ्यात
चोपडा (18 नोव्हेंबर 2024) : चोपडा ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन आरोपींना गावठी कट्टा आणि जिवंत काडतूसांसह पकडल्याने खळबळ उडाली आहे. लासूर येथील देवी कमळजा माता मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात 15 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 10 वाजता लासूर ते सत्रासेन रस्त्यावरील देवी कमळजा माता मंदीराजवळील टेकडीजवळ लासुर, ता. चोपडा, जि.जळगाव येथे दोन आरोपींना गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.
शिवतेज शिवाजी जावळे (30, रा.चांदापूर्व, ता.नेवासा, जि.अहमदनगर) आणि अक्षय रामदास चेमटे (24, रा.श्रीरामनगर, ता.नेवासा, जि.अहमदनगर) यांना ताब्यात घेतले. संशयीतांकडील 30 हजार रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचा स्टील कट्टा मॅग्झिनसह, 300/- रुपये रोख एक हजार रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस आणि 200 रुपये मिळून एकूण 31 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक शशिकांत पारधी, रावसाहेब पाटील, चेतन महाजन आणि निलेश पाटील आदींनी केली. तपास पोलीस नायक शशिकांत पारधी करीत आहेत.