किनगाव-यावल रस्त्यावर सरपंचाला अडवून मोबाईलसह रोकड लूटली : दोघांना अटक
यावल (18 नोव्हेंबर 2024) : किनगाव-यावल रस्त्यावर दुचाकीव्दारे मागून येत लाथ मारून दुसर्या समोरील दुचाकी चालकास रोखत त्याच्याकडील दहा हजारांची रोकड व मोबाईल दोन अज्ञात चोरट्यांनी लांबवला होता. ही घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
असे आहे प्रकरण
भालशीव-पिंप्री येथील सरपंच मोहन एकनाथ सपकाळे व शिवलाल भगवान सपकाळे हे चोपडा येथून शनिवारी रात्री यावलकडे येत होते. किनगावजवळ त्यांच्या दुचाकी (क्रमांक एम.एच.19 बी. एल.0051) ला मागुन येणार्या दुचाकी (क्रमांक एम. एच. 28 ए. डब्ल्यू. 238) वरील इसमाने लाथ मारली व हत्याराचा धाक दाखवून तुम्हारे पास के सारे पैसे मुझे दे दो, नही तो मै तुम्हे मार डालुंगा अशी धमकी देत मोबाईल व 10 हजाराची रोकड लांबवली. यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांनी रात्रीच तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासातच गाडी कुणाची ?याचा तपास लावून दोघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे.