मुक्ताईनगर मतदारसंघाला रविंद्र भैय्यांच्या रूपाने दोन आमदार मिळणार : रोहिणी खडसे
बोदवड (18 नोव्हेंबर 2024) : इतर मतदारसंघात मतदानातून एक आमदार निवडला जाणार आहे परंतु मुक्ताईनगर मतदासंघांत तुम्ही तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीला मतदान करून दोन आमदार निवडणार आहात, असे प्रतिपादन रोहिणी खडसे यांनी बोदवडमधील जाहीर सभेत केले. तुमच्या मतदानाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणारं आहे आणि सरकार आल्या नंतर रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांना विधानपरिषदचे आमदार बनवण्याचे आश्वासन पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेले आहे आणि आपण सुद्धा त्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे आग्रह धरणार आहे म्हणून आपले एक एक मत महत्वाचे असुन तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटण दाबुन मतदान रूपी आशीर्वाद देण्याची त्यांनी उपस्थितांना विनंती केली.
बोदवडला प्रचार सभा
मुक्ताईनगर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ड रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ बोदवड येथिल गांधी चौकात माजी महसुल मंत्री आमदार एकनाथराव खडसे, जेष्ठ नेते रवींद्र भैय्यासाहेब पाटील, विशाल खोले महाराज यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते
एक मत महत्त्वाचे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना अॅड.रोहिणी खडसे बोलत होत्या त्या म्हणाल्या बोदवड तालुक्याने कायम शरद पवार साहेबांवर निष्ठेने प्रेम केलेले आहे ते प्रेम कायम ठेवा अशी विनंती करायला मी आले आहे
राज्यातील शेतकरी कष्टकरी सामान्य जनतेच्या विरोधी असणारे महायुती सरकार बदलवून जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी शरद पवार साहेब राज्यभर प्रचार सभा घेत आहेत म्हणून आपले एक एक मत महत्वाचे आहे.
तुमच्या मतदानाने राज्यात महाविकास आघाडीचे येणार आहे
सरकार आल्या नंतर जेष्ठ नेते रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांना विधानपरिषदेवर आमदार बनवण्याचे आश्र्वासन पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेले आहे
लोकसभा निवडणूक प्रचारावेळी मुक्ताईनर येथिल जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेबांनी सुद्धा तसा शब्द दिलेला आहे
म्हणून आपले एक एक मत महत्वाचे असुन आपण तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीला दिलेल्या मतदानाने राज्यात पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार येऊन दोन आमदार मिळणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले . आपल्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटण दाबुन मतदान रूपी आशीर्वाद देण्याची त्यांनी विनंती केली.