विधानसभा निवडणुकीचे कर्तव्य बजावून घरी निघालेल्या बभळाजच्या शिक्षकाचा दचाकी अपघातात मृत्यू
जळगाव (20 नोव्हेंबर 2024) : चोपडा तालुक्यातील अनवर्दे-बुधगांव येथे निवडणुकीचे कर्तव्य पार पडून दुचाकीने घरी परतणार्या शिक्षकाचा अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेनंतर मृत्यू झाला. लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (49, रा.बभळाज, ता.शिरपूर) असे मृताचे नाव आहे.
चोपडा तालुक्यातील अनवर्दे-बुधगाव येथे उपशिक्षक म्हणून ते कार्यरत होते. त्याच ठिकाणी त्यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली हेाती. निवडणुकीचे मतदान आटोपून सायंकाळी दुचाकीने ते घराकडे निघाले होते. गलंगी गावाजवळ रात्री सात वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.
या अपघातात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.