विधानसभा निवडणूक : रावेरात 73.84 तर मुक्ताईनगरात 70.71 टक्के मतदान
भुसावळ (21 नोव्हेंबर 2024) : रावेरसह मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रासाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. रावेरसह मुक्ताईनगर मतदारसंघातील काही भागात रात्री उशिरापर्यंत मतदान चालले. रावेर विधानसभेत 73.84 तर मुक्ताईनगरात 70.71 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक प्रशासनाने कळवले आहे. रावेरात साडेचार टक्के तर मुक्ताईनगरात तीन टक्क्यांनी गत वेळच्या तुलनेत वाढ झाली.
रावेरात वाढला टक्का
सूत्रांच्या माहितीनुसार, रावेर विधानसभेत 2009 मध्ये 62.74, 2014 मध्ये 66.82 तर 2019 मध्ये 69.34 टक्के मतदान झाले होते मात्र 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी साडेचार टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. यावेळी 73.84 टक्के मतदान झाले असून त्यात तीन लाख नऊ हजार 536 पैकी दोन दोन लाख 28 हजार 573 मतदारांनी हक्क बजावला. त्यात दोन तृतीयपंथीयांसह एक लाख 18 हजार 801 पुरूष तर एक लाख 10 हजार 470 स्त्री मतदारांनी हक्क बजावला.
मुक्ताईनगरात 70.71 टक्के मतदान
मुक्ताईनगर विधानसभेसाठी 2009 मध्ये 72.07 टक्के, 2014 मध्ये 68.83, 2019 मध्ये 67.65 तर 2024 मध्ये 70.71 टक्के मतदान झाले. तीन लाख चार हजार 64 पैकी दोन लाख 15 हजार 11 मतदारांनी हक्क बजावला. त्यात दोन तृतीय पंथीयांसह एक लाख 11 हजार 113 पुरूष तर एक लाख तीन हजार 896 स्त्री मतदारांनी हक्क बजावला.