रावेरात उद्या 14 टेबलांवर होणार मतमोजणी : प्रशासन सज्ज


रावेर (22 नोव्हेंबर 2024) : रावेर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. 14 टेबलावर मतमोजणीला शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी बबनराव काकडे यांनी दिली. दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होऊन निकाल लागण्याची शक्यता आहे. रावेर तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या मध्यवर्ती भागात मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मतमोजणीच्या होणार 13 फेर्‍या
शनिवार, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 14 टेबलावरून मतमोजणी सुरू होईल. टपाली मतांसाठी सात टेबल ठेवण्यात आले असून मतमोजणीच्या 23 फेर्‍या होतील. दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी बबन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करीत आहेत. त्यासाठी तहसीलदार बंडू कापसे, तहसीलदार यावल मोहनमाला नाझीरकर, निवडणूक नायब तहसीलदार किशोर पवार, आर.डी.पाटील कामकाज करीत आहेत. मंडळाधिकारी विठोबा पाटील हे सर्व टेक्निकल कामकाज सांभाळत आहे.


कॉपी करू नका.