चारित्र्याच्या संशयाचे मानगुटीवर भूत : दोन्ही चिमुकल्यांची कुर्‍हाडीने हत्या करीत पत्नीवरही प्राणघातक हल्ला


The ghost of doubt about character : He killed both his children with an axe and also attacked his wife. चोपडा (27 नोव्हेंबर 2024) : चारित्र्याच्या संशयावरून संशयी पतीने पत्नीवर कुर्‍हाडीचे चार ते पाच वार केले तसेच चिमुकल्या दोन्ही मुलांवर कुर्‍हाड चालवल्याने दोन्ही चिमुकल्यांचा करुण अंत झाला. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या सीमेवरील देवळी गावी घडली. संजय नानसिंग पावरा (23) यास पोलिसांनी अटक केली आहे. मृतांमध्ये पाच वर्षांचा मुलगा डेव्हिड व तीन वर्षाची मुलगी डिंपलचा समावेश आहे.

चारित्र्याच्या संशयातून घटना
चोपडा तालुक्यातील गौर्‍यापाडा येथे पावरा कुटूंब वास्तव्यास होते. संजय नानसिंग पावरा (23) यास पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने 18 रोजी झालेल्या भांडणानंतर पत्नी दोन्ही मुलांना घेवून मध्यप्रदेशातील देवळी येथे निघून गेली मात्र त्यानंतरही पती देवळी येथे पोहोचला.

पत्नीशी पुन्हा झालेल्या वादानंतर आरोपीने संतापाच्या भरात स्वतःच्या दोन चिमुकल्यांना कुर्‍हाडीने वार करून ठार केले व पत्नीच्या डोक्यावरही कुर्‍हाडीने पाच ते सहा वार केले. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

या घटनेनंतर नागरिकांनी संजय पावरा यास पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी मध्य प्रदेशातील वरला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

गंभीर जखमी पत्नीला मेंदूपर्यंत मार लागला असल्याने तिच्यावर धुळे येथील शासकीय रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.


कॉपी करू नका.