रावेरात बारी समाजाचा वधू-वर मेळावा : ‘वेल बंधनाची’ परिचय पुस्तिकेचे प्रकाशन
Bride and groom gathering of Bari community in Raveer : Publication of introductory booklet on ‘Vel Bandhan’ रावेर (27 नोव्हेंबर 2024) : बारी समाजातील उपवर-वधू यांचा परिचय मेळावा नुकताच झाला. यात 128 मुले, 64 मुली अशा 192 जणांनी आपला परिचय दिला. यावेळी ‘वेल बंधनाची’ या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सौ.कमलाबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये बारी समाज व नागवेल युवा फाउंडेशनतर्फे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष अनिल पाटील होते. यावेळी नवनिर्वाचित आमदार यांच्या पत्नी जयश्री जावळे, मुक्ताईनगरचे आमदार यांची कन्या संजना पाटील, पद्माकर महाजन व उपस्थितांच्याहस्ते ‘वेल बंधनाची’ या वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. समाजातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. खेळाडूंचे सत्कार करण्यात आला .
यांची होती उपस्थिती
यावेळी 64 मुली 128 मुले मिळून 192 उपवर-वधूंंनी आपला परिचय दिला. मेळावास महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात व विदर्भ तसेच जिल्ह्यातील राज्यातील समाज बांधव व युवक-युवती मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी महेश चौधरी, शीतल पाटील, नितीन बारी, भास्कर महाजन, अमोल पाटील, माया बारी, लतीश बारी, अरुण बारी, सुरेश बारी, राजेंद्र बारी, रत्न बारी, महेंद्र बारी, बी.डी.बारी, किरण बारी, कैलास बारी, रमेशचंद्र बारी, प्रकाश कोल्हे, अरुण कोल्हे, उमेश महाजन, महेश चौधरी, अरविंद देशमुख, जगदीश पोकळे, रवींद्र बारी, सुरेश तपकीर (पुणे), राजेंद्र बारी (शिरपूर), सुनील बारी, राकेश डबे, माधव बारी, मधुकर बारी, रतन बारी, अवधूत कोल्हे, संतोष चौधरी उपस्थित होते. मेळाव्यासाठी समाजबांधव, नागवेल युवा फाउंडेशनचे पदाधिकारी, महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मोहन बारी, कोमल पाटील, कोमल योगेश पाटील व सुनील बारी यांनी तर आभार प्रा.डॉ.रमेश बारी यांनी मानले.