जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांचे झळकले भावी उपमुख्यमंत्री म्हणूनचे बॅनर !

खान्देशला मिळणार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची संधी?


Will Khandesh get the opportunity to become Deputy Chief Minister for the first time? जळगाव (29 नोव्हेंबर 2024)  : राज्यातील सीएम पदाचा तिढा जवळपास संपण्यात आला असून आता राज्यात दोन उपमुख्यमंत्र्यांची वर्णी लागणार आहे. अजित पवारानंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होवू शकतात अथवा ते अन्य सहकार्‍यांना संधी देण्याची शक्यता असल्याने गुलाबराव पाटील यांना ही संधी मिळेल, अशी दाट शक्यता आहे. या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते गुलाबराव पाटील यांना उपमुख्यमंत्री पदाची लॉटरी लागू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. गुलाबराव पाटील यांचा भावी उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेले बॅनर जळगाव ग्रामीण मतदार संघात झळकल्यामुळे याची चर्चा अधिकच होत आहे.

पदांची खान्देशला हुलकावणी
राज्याच्या राजकीय वर्तुळात जळगाव जिल्ह्यातील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या भागातील नेत्यांनी नेहमीच आपापल्या पदाचा व आपापल्या नावाचा दबदबा राज्याच्या राजकारणात निर्माण केलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रतिभाताई पाटील यांनी थेट राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली होती. परंतु राज्याच्या राजकारण्याच्या दृष्टीने विचार केला तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे पद नेहमीच खान्देशला हुलकावणी देत राहिले आहे.

जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला उपमुख्यमंत्री पद ?
सध्याच्या घडीला जळगाव जिल्ह्यात तीन नेते महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामध्ये गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील या तिघांनीही मंत्रीपदाची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळलेली आहे. आता राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली तर मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे पक्ष प्रमुख्याच्या भूमिकेत राहतील व त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री पद हे दुसर्‍या शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्त्याला मिळेल. त्यामुळे हे पद जळगाव जिल्ह्याला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.

एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या नावाची यादी उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू होती परंतु त्यांना आता केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यामुळे आता गुलाबराव पाटील यांचा उपमुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा असल्याचेही बोलले जात आहे.

खान्देशची मुलुख मैदान तोफ म्हणून राज्यभर ओळख असणारे तसेच एकनाथ शिंदे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळख असलेले गुलाबराव पाटील यांची थेट उपमुख्यमंत्रीपदी वर्णी वनी लागल्यास खान्देशच्या विकासाचा अनुशेष भरून निघेल, असेदेखील बोलले जात आहे.


कॉपी करू नका.