जळगावातील कुविख्यात गुरुजीतसिंग बावरीसह चाळीसगावातील भोला अजबे स्थानबद्ध
Bhola Ajabe from Chalisgaon along with the notorious Gurujit Singh Bawari from Jalgaon has been arrested. जळगाव (1 डिसेंबर2024) : सामाजिक शांततेला अडसर ठरु पाहणार्या चाळीसगावसह जळगावातील कुविख्यात दोघत्तंना एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले. जळगाव एमआयडीसी हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार गुरुजितसिंग सुजानसिंग बावरी तर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार निखील उर्फ भोला सुनील अजबे अशी स्थानबद्ध झालेल्या संशयीातांची नावे आहेत. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. गुरुजितसिंगविरुध्द 11 गुन्हे तर निखील अजबे याच्याविरुद्ध नऊ गुन्हे दाखल आहेत.
एमआयडीसी पोलिसांनी सादर केला प्रस्ताव
गुरुजितसिंग बावरी याच्याविरुद्धचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व त्यांच्या सहकार्यांनी तयार केला होता. निखील उर्फ भोला सुनील अजबे याच्याविरुद्धचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी व त्यांच्या सहका-यांनी तयार केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड व त्यांच्या सहकार्यांनी या प्रस्तावाला मूर्त स्वरुप देत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्याकडे सादर केलेल्या या प्रस्तावाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मान्यता दिली.
एमआयडीसी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, योगेश बारी, किशोर पाटील, छगन नलावडे, किरण पाटील आदींनी गुरुजितसिंग बावरी याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
चाळीसगावात गुन्हेगारा कोल्हापूरात स्थानबद्ध
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकातील श्रेणी पोलीसस उपनिरीक्षक सुभाष पाटील, पोहेकॉ योगेश मांडोळे, राहुल सोनवणे, भुपेश वंजारी, नरेंद्र चौधरी, समाधान पाटील, राकेश महाजन, पवन पाटील, नितेश पाटील आदींनी गुन्हेगार निखील अजबे याची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील हवालदार अनिल पंडीत दामोदरे, जयंत भानुदास चौधरी, रफिक शेख कालु, संदीप चव्हाण, पोकॉ. ईश्वर पंडीत पाटील आदींनी या प्रस्ताव तयार करण्याकामी सहभाग घेतला.