राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांची वर्णी ! : 5 रोजी मुंबईत शपथविधी


Devendra Fadnavis nominated for the post of Chief Minister of the state !: Swearing-in ceremony in Mumbai on 5th मुंबई (1 डिसेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आठवडा उलटून गेल्यानंतरही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण, याबाबत स्पष्टता नव्हती मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे स्पष्ट आहे. नव्या सरकारचा शपथविधी मंगळवार, 5 रोजी आझाद मैदानावर होणार असून त्या संदर्भातील तयारीला वेग आला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या संदर्भात घोषणा केली आहे.

उद्या गट नेते पदाची निवड
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर दोन दिवसांपूर्वी झालेल्या महायुतीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रिपदी फडणवीसच असतील हे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले. दरम्यान, सोमवारी दुपारी एक वाजता विधान भवनात गटनेता निवडण्यात येणार आहे.

शपथविधीला पंतप्रधान येणार
नवी मुंबईतील आझाद मैदानावर मंगळवार, 5 रोजी शपथविधी सोहळा होणार असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपातील श्रेष्ठी येणार आहेत.

शिवसेना शिंदे गटाने मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्याने त्यांना गृह मंत्रालयाचे खाते हवे असल्याचे शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे मूळ गावी परतले
एकनाथ शिंदे हे दरे या सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी गेले असून तेथे त्यांना ताप आल्याने औषधोपचार सुरू करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.


कॉपी करू नका.