भुसावळसह 12 रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म तिकीट विक्रीवर बंदी : ‘हे’ कारण आले समोर


To avoid crowding, platform ticket sale banned at 12 railway stations including Bhusawal भुसावळ (1 डिसेंबर 2024) : महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे स्थानकावर प्रवाशांची होणारी गर्दी पाहता भुसावळसह 12 रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. 2 ते 9 डिसेंबर ही बंदी असणार आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रित करणे आणि स्थानिक परिसरात प्रवाशांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

2 ते 9 डिसेंबरदरम्यान तिकीट विक्री बंद
मुंबईत महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेत प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीवर 2 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत 12 स्थानकावर बंदी असेल. या काळात बडनेरा, अकोला, नांदुरा, मूर्तिजापूर, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद असणार आहे. प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरज असलेल्या प्रवाशांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. दरम्यान सुरळीत आणि सुरक्षित प्रवास अनुभवण्यासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


कॉपी करू नका.