मुंबईतील तरुणीला डिजिटल अ‍ॅरेस्ट दाखवत एक लाख 78 हजारांचा गंडा


मुंबई (1 डिसेंबर 2024) : डिजिटल अ‍ॅरेस्टच्या घटना सर्वदूर घडत असल्याने समाजमन चिंतीत असताना मुंबईतील तरुणीलाही गंडा घालत विवस्त्र होत गंडा घालण्यात आला आहे. पोलिस अधिकारी असल्याचे भासविणार्‍या भामट्यांनी डिजिटल अटक घोटाळ्यात तरुणीकडील एक लाख 78 हजार रुपयांची फसवणूक केली.

मनी लॉड्रिंग प्रकरणात सहभागाचा लावला आरोप
पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरनुसार, ही घटना 19 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान घडली. एका फार्मास्यूटिकल कंपनीत काम करणार्‍या या तरुणीला दिल्लीतील पोलिस अधिकारी असल्याचा दावा करणार्‍या व्यक्तीचा फोन आला. त्यांनी तिच्यावर उद्योगपती नरेश गोयल यांच्याशी संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचा खोटा आरोप लावला, फसवणूक करणार्‍यांनी अनेक फोन नंबर वापरून तिला अटक करण्याची धमकी दिली आणि आभासी चौकशीसाठी तिला हॉटेलची खोली बुक करण्यास भाग पाडले.

व्हिडीओ कॉलच्या दरम्यान, गुन्हेगारांनी महिलेला बँक खाते पडताळणीसाठी 1.78 लाख रुपये ट्रान्सफर करायला लावत फसविले. त्यानंतर, त्यांनी बॉडी चेकिंगच्या बहाण्याने तिला कपडे उतरविण्यास भाग पाडले.

दरम्यान, पीडितेने 28 नोव्हेंबर रोजी या घटनेची तक्रार केली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


कॉपी करू नका.