हिंगोणा येथे किरकोळ वादातून महिलेला मारहाण
यावल (2 डिसेंबर 2024) : यावल तालुक्यातील हिंगोणा गावात 47 वर्षीय महिलेला बकर्यांचे पिल्लू आमच्या घराच्या गच्चीवर नेहमी घाण करतात अशा बोलण्याच्या कारणावरून एकाने मारहाण केली व डोक्यात वीट मारून दुखापत केली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिविगाळ करीत मारहाण
हिंगोणा गावात सुरेखा जगन्नाथ तायडे (47) ही महिला राहते. या महिलेने चेतन वसंत तायडे याला सांगितले की, तुमच्या बकर्याचे पिल्लू आमच्या घराच्या गच्चीवर येऊन नेहमी घाण करतात. यावरून वाद झाला आणि चेतन तायडे याने महिलेला शिविगाळ करून मारहाण केली. डोक्यात वीट मारून दुखापत करीत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात चेतन तायडे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सायकल रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार देविदास सूरदास करीत आहे.