भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार निता लबडे यांना संविधानाची प्रत भेट
भुसावळ (2 डिसेंबर 2024) : भारतीय संविधान दिनानिमित्त भुसावळचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार निता लबडे, नायब तहसीलदार प्रीती लूटे यांना भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे यांच्यातर्फे संविधानाची प्रत भेट देऊन सन्मानित करण्यात आले. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत आदर्श कामगिरी बजावलेले कर्तव्यदक्ष अधिकारी यासाठी हा उपक्रम राबविला.