फैजपूर शहरात घरफोडी : 27 हजारांचा ऐवज लंपास
Burglary in Faizpur city : Property worth Rs 27,000 looted फैजपूर (3 डिसेंबर 204) : शहरातील गुरुदत्त कॉलनीतील बंद घराला टार्गेट करीत चोरट्यांनी 27 हजारांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
राजू सिकंदर तडवी (36, गुरुदत्त कॉलनी, फैजपूर) यांच्या तक्रारीनुसार, 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी दरवाजाचा कुलूप व कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. गोदरेज कपाटातील एक हजार दोनशे रुपये किंमतीचे चांदीचे जोडवे, 11 हजार रुपये किंमतीचे दोन ग्रॅमचे मंगळसूत्र, अडीच हजार रुपये किंमतीची चांदीची लक्ष्मी मूर्ती, 12 हजार रुपये किंमतीच्या रिंगा असा एकूण 26 हजार 700 रुपयांचा ऐवज लांबवण्यात आला. सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी भेट देत पाहणी केली.