एकनाथ शिंदेनी सत्तेत रहावे ! : आमदार-खासदारांचा आग्रह


Eknath Shinde should remain in power ! : MLAs and MPs urge जळगाव (3 डिसेंबर 2024) : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी असल्यानं सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. केंद्रातील भाजप सरकार बहुमतानं सत्तेत नाही. त्यामुळे तिथे शिवसेनेची भूमिका महत्त्वाची आहे. उपमुख्यमंत्रिपदासह गृह मंत्रालय मिळत नसेल तर आम्ही सत्तेबाहेर राहतो, अशी शिंदेंची भूमिका आहे. पण आमदारांचा व खासदारांचाही आग्रह सत्तेत राहण्याचा आहे.

मंत्री मंडळात सहभागी व्हा
मंत्री मंडळात सहभागी व्हा, असा आग्रह खासदारांनी शिंदेंकडे धरला मंत्री मंडळात सहभागी न झाल्यास त्याचे काय परिणाम होतील याची कल्पना खासदारांनी शिंदेंना दिली. शिंदेंनी पक्षाला सत्तेबाहेर ठेवण्याचा किंवा सहकार्‍यांनी सत्तेत पाठवून स्वत: बाहेर राहण्याचा निर्णय घेऊ नये, असा खासदारांचा आग्रह आहे.

वाटाघाटीत महत्त्वाची खाती हवी
मुख्यमंत्री असताना तुमचा प्रशासनावर वचक निर्माण झाला आहे. तसा वचक अन्य कोणाचाही नसे त्यामुळे वाटाघाटीत महत्त्वाची खाती घ्या. ती अन्य कोणाकडे देऊ नका,’ अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या खासदारांनी शिंदेंकडे केली. मुख्यमंत्रीपद सोडणार्‍या शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आहे. उपमुख्यमंत्री पदासह गृह मंत्रालयाची जबाबदारी मिळावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह मंत्रिपद होतं. तोच पॅटर्न पुन्हा राबवण्यात यावा, अशी शिवसेनेची मागणी आहे.


कॉपी करू नका.