गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची होणार तपासणी


Applications for the game-changing Ladki Bahin scheme will be scrutinized मुंबई (4 डिसेंबर 2024) : लाडक्या बहिणींना निवडणूक होताच 2100 रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने निवडणुकीत केली होती मात्र ही घोषणा अद्याप अंमलात आली नसताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर लाडक्या बहिण योजनेतील सर्व अर्जांची ची पुन्हा उलटतपासणी करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचे वृत्त दिव्य मराठीने ऑनलाईन दिले आहे.

  • या लाभार्थींना योजनेतून वगळणार
    निवृत्तीवेतन प्राप्त करणार्‍या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छाननीला सामोरे जावे लागेल
  • ज्या महिलांच्या नावावर पाच एकरांपेक्षा जास्त जमीन आहे, अशा महिला या योजनेसाठी अपात्र असतील
  • एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • कागदपत्रांची होणार कसून तपासणी
    ज्या लाभार्थ्यांना आधीपासून लाभ मिळाला आहे, त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यांना सामोरे जावे लागेल.
  • पहिल्या टप्प्यात ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा आणि अर्जदारांनी दाखल केलेल्या इतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी होईल.
  • अधिकारी पडताळणीसाठी थेट लाभार्थींच्या घरी भेट देतील. यामध्ये पात्रतेची पुष्टी करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणाचा समावेश असू शकतो.
  • लाभार्थ्यांनी केलेले दावे ओळखण्यासाठी सरकार त्यांच्या डेटाची तुलना मतदार याद्या, आयकर रेकॉर्ड किंवा आधार-लिंक डेटा अशा अधिकृत डेटाबेससोबत करेल.
  • पडताळणी प्रक्रियेत पंचायत प्रमुख किंवा शहरी संस्थांचे प्रतिनिधी यांसारखे स्थानिक प्रतिनिधी देखील सहभागी होऊ शकतात.

त्रृटी आळढल्यास योजनेपासून मुकणार ?
खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी अर्जदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची पडताळणी होईल शिवाय उलटतपासणी अंती पात्र लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रृटी आढळल्या तर त्यांना या योजनेपासून मुकावे लागेल. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी, समाजकल्याण संघांसह अनेक विभागांचा समावेश असणार आहे.

सरकार आता केवळ पात्र महिलांपर्यंतच मदत पोहोचतेय ना? याबाबत खात्री करण्यावर भर देणार आहे. आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी ही प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


कॉपी करू नका.