लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली ही भूमिका


When will my beloved sisters get Rs 2100? Chief Minister Devendra Fadnavis presented this position मुंबई (6 डिसेंबर 2024) : लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये खात्यात येण्याची प्रतीक्षा आहे. या संदर्भात महायुतीचे सरकार स्थापन होताच सीएम देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. ‘आधी आर्थिक स्रोताची व्यवस्था करून रक्कम वाढवू’ असे ते म्हणाले आहेत.

निकषातील बहिणींनाच यापुढे योजनेचा लाभ
फडणवीसांनी सांगितले की, शेतकरी सन्मान योजना जेव्हा सुरू केली तेव्हा अनेक सधन शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळाला होता. मात्र, सरकारच्या आवाहनानंतर सधन शेतकर्‍यांनी तो लाभ सोडला होता. मग ही योजना स्थिर झाली. त्याप्रमाणेच लाडकी बहीण योजनाही स्थिर होईल मात्र या योजनेत काही लाडक्या बहिणी निकषाच्या बाहेर असतील त्यावर विचार करू.





विरोधी पक्षनेता नसण्याचे संकेत
विरोधकांकडे नियमानुसार अपेक्षित संख्याबळ नसले तरी मविआतर्फे विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जाणार आहे, असे निदर्शनास आणून दिले असता फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार सभागृहाच्या अध्यक्षांचा असतो. तो सरकारचा निर्णय नसतो. त्यामुळे अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. लोकसभेतही 10 वर्षे विरोधी पक्षनेतेपद नव्हते तरीदेखील जो सर्वात मोठ्या पक्षाचा नेता होता त्याला लोकसभेने विरोधी पक्षनेत्याप्रमाणे सगळे अधिकार दिले होते. त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला तर तोही मान्य असेल.

शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरमध्येच विरोध, चर्चेतून मार्ग काढू
नागपूर ते गोवा शक्तिपीठ मार्गाला सांगली जिल्ह्यापर्यंत समर्थन, तर कोल्हापूर जिल्ह्यात विरोध आहे. शेतकर्‍यांचा विरोध पत्करून आणि त्यांच्या जमिनी घेऊन विकास करण्याची मानसिकता आमची नाही. त्यामुळे चर्चेतून मार्ग काढू. समृद्धीमुळे जसे मराठवाड्यातील चित्र बदलले तसेच शक्तिपीठमुळे अनेक भागांचे चित्र बदलेल, असे सांगत फडणवीस म्हणाले की, शक्ती कायद्यातील काही तरतुदींसंदर्भात सुप्रीम कोर्टाने काही विसंगत निर्णय दिले. यानंतर केंद्र सरकारने तीन कायदे आणले. त्यात आपले कायदे विसंगत होताहेत. त्यामुळे केंद्र सरकारशी बोलणी करू.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !