चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी : अल्लू अर्जुनविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
हैदराबाद (6 डिसेंबर 2024) बहुप्रतीक्षीत पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाची मोठी उत्सुकता लागली आहे मात्र याच चित्रपटाच्या प्रदर्शनात अचानक अल्लू अर्जुन पोहोचल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू ओढवल्यानंतर अल्लू अर्जुनविरोधात व संध्या सिनेमाच्या व्यवस्थापकांविरोधात आता गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
पोलिसांनी सांगितले की, अल्लू अर्जुन बुधवारी रात्री संध्या थिएटरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आला होता. आरटीसी एक्स रोड येथील चित्रपटगृहाबाहेर जमलेल्या चाहत्यांना अल्लू अर्जुनला भेटायचे होते. यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली. धक्काबुक्कीमुळे अनेक जण एकमेकांवर पडले. काही लोक जखमीही झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.





जमाव शांत झाल्यानंतर पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी एका महिलेला मृत घोषित केले. सध्या मृत महिलेची ओळख पटलेली नाही तर तीन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. यामध्ये अल्लू अर्जुनचे चाहते बेशुद्ध अवस्थेत दिसले. पोलिसांनी त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला.
उशिरा आल्यानंतर चेंगराचेंगरी
मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुन स्क्रिनिंगदरम्यान वेळेवर पोहोचला नाही. त्यामुळे चाहत्यांची गर्दी वाढतच होती. अल्लू अर्जुन शो संपल्यावर संध्या थिएटरमध्ये पोहोचला, तेव्हा त्याला पाहण्यासाठी चाहते बेभान झाले. वृत्तानुसार, घटनास्थळी तैनात असलेल्या सुरक्षा आणि पोलिस कर्मचार्यांची संख्या परिस्थिती हाताळण्यासाठी तोकडी होती.
