भरधाव दुचाकी पोलिसांच्या वाहनावर आदळल्याने जळगावातील तरुणाचा मृत्यू


A young man from Jalgaon died after a speeding motorcycle hit a police vehicle. जळगाव (9 डिसेंबर 2024) : जळगाव शहरातील कला भवनाजवळ दुचाकी पोलिसांचे बॅरिकेटस् घेवून जाणार्‍या वाहनावर आदळल्याने भावंडे गंभीररित्या जखमी झाली होती. यातील एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ईश्वरसिंग मिहेरसिंग टाक (35, सदगुरू नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.

अपघातातील जखमीचे निधन
जळगाव शहरातील कला भवनाजवळून शुक्रवार, 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास पोलिस दलाचे वाहन (क्र.एम.एच.19 एम.9214) हे सिंधी कॉलनीकडून पांडे डेअरी चौकाकडे जात असताना ईश्वरसिंग मिहेरसिंग टाक (35) व त्यांचा भाऊ नेपालसिंद मिहेरसिंग टाक (36) हे दोघे भाऊ दुचाकी (क्रमांक एम.एच.19 टी.6818) ही वेडीवाकडी चालवत सिंधी कॉलनीकडे जात असतांना त्यांची दुचाकी पोलिीसांच्या वाहनावर धडकली. या अपघातात दोन्ही भाऊ गंभीर जखमी.

दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असता गंभीर जखमी झालेल्या ईश्वरसिंग मिहेरसिंग टाक याचा सोमवार, 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.


कॉपी करू नका.