सावरकरांचा अपमान होताना ठाकरे गप्प का ? चंद्रशेखर बावनकुळे

Why is Thackeray silent when Savarkar is being insulted ? Chandrashekhar Bawankule मुंबई (10 डिसेंबर 2024) : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टिका करीत वीर सावरकर यांचा अपमान होत असताना त्यांनी चुप्पी का साधली ? असा सवाल केला आहे. बेळगावात मराठी भाषकांनी महाराष्ट्र एकीकरणासाठी छेडलेले आंदोलन कर्नाटक पोलिसांनी दडपले तर कर्नाटक सरकारने त्यांच्या विधानसभेतील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमाही हटवणार असल्याचे म्हटल्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
काँग्रेसच्या कळपातून बाहेर का पडले नाही ?
बावनकुळे म्हणाले की, कर्नाटक सरकारने विधानसभेतील स्वा. सावरकरांचा फोटो काढून राहुल गांधीच्या सावरकरविरोधी भूमिकेला समर्थन दिले आहे. खरंतर राहुल गांधी देशभरात फिरत असताना सावरकरांच्या विरोधी भूमिका घेत असतात. कर्नाटक सरकारने हे निंदनीय कृत्य केले आहे. हे सर्व होत असताना मात्र उद्धव ठाकरे झोपी गेले आहे. यावर संजय राऊत सकाळी का बोलले नाही. काँग्रेसच्या कळपातून बाहेर का पडले नाही ? असा प्रश्न त्यांनी केला.
बांगलादेशच्या हिंदूंच्या मागे जगभरातील हिंदू उभा
बांगलादेशच्या हिंदूंच्या मागे जगभरातील हिंदू उभा आहे. त्यांची तीव्र भावना आहेत. बांगलादेशी हिंदू आपला परिवार आहेत, त्यांच्या पाठिशी आपन राहिले पाहिजे. त्यामुळे जनतेच्या भावना तीव्र आहेत. आमचे सरकार त्यावर योग्य पद्धतीने लक्ष देत असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.