बांगलादेशातील हिंदूंचे मानवाधिकार उल्लंघण थांबवा : रावेरात निवेदन


रावेर (11 डिसेंबर 2024) : बांगलादेशातील हिंदू संत आणि हिंदूंवरील अत्याचाराची जागतिक मानवाधिकार आयोगाने आणि भारत सरकारने दखल घ्यावी, हिंदूवरील अत्याचार थांबवावे या मागणीसाठी रावेर परिसरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगळवारी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होणार्‍या अत्याचार व साधू संतांवर होणार्‍या अपमानजनक कारवाया रोजच होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कृषी बाजार समिती सभागृहात सकल हिंदू समाज बांधवांची बैठक घेण्यात आली. या ठिकाणी विविध मान्यवर यांनी मनोगत व्यक्त करून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी वक्त्यांकडून हीच ती वेळ आहे. संबंध हिंदू समाजाने एकत्र येण्याची आणि एकजूटता दाखविण्याची. असे आवाहन करण्यात आले.

यांचा होता सहभाग
संत श्री दिव्य चैतन्य महाराज, हरिष चैतन्य महाराज, कैवल्यानंदगिरी महाराज, लक्ष्मणदास महाराज, हरि चैतन्य महाराज, ऋषीकेश महाराज, कपिल महाराज, हभप कांतीलाल महाराज, हभप संतोष महाराज यांच्यासह राष्ट्रप्रेमी सकल हिंदू बांधव उपस्थित होते. बैठक आटोपल्यावर शांततेत जाऊन सर्वानी तहसीलदार बंडू कापसे यांना निवेदन दिले. यावेळी सहा.निरीक्षक अंकुश जाधव, उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांनी बंदोबस्त ठेवला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !