भुसावळातील भागीरथी प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट
आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठा मंडळाचा उपक्रम
Educational materials were gifted to the students of Bhagirathi Primary School in Bhusawal. भुसावळ (12 डिसेंबर 2024) : भुसावळकरांचे लाडके आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे जामनेर रोडवरील भागीरथी प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने खुलले होते.
आमदारांचा सहृदय सत्कार
बुधवार, 11 डिसेंबर रोजी आमदार संजय सावकारे यांचा वाढदिवस असल्याने सालाबादाप्रमाणे शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे भागीरथी प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येकी विद्यार्थ्याला दोन नोटबुक, पेन्सील शार्पनर, पेन
बिस्कीट व चॉकलेट, केकचे वाटप करण्यात आले. आमदार संजय सावकारे यांचा शाळा प्रशासनातर्फे सहृदय सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार संजय सावकारे व प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळा प्रशासनातर्फे आमदारांचा सहृदय सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास माजी नगरसेवक पिंटू कोठारी, सोनिच्छा ट्रस्टचे संचालक डॉ.ललित चौधरी, डॉ.चित्तरंजन चौधरी, किशोर चौधरी, कावेरी चौधरी, जयश्री चौधरी यांनी आमदार संजय सावकारे यांचा सत्कार करण्यात आला. भागीरथी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय फेगडे व शिक्षकवृंदांनी आमदारांचा सत्कार केला. भाजपा शहराध्यक्ष अनिता आंबेकर तसेच प्रतिष्ठा मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या. सूत्रसंचालन इतवारे यांनी केले. यशस्वीतेसाठभ प्रतिष्ठा मंडळाच्या नगरसेविका सोनल महाजन, राजश्री देशमुख, राजश्री बादशाह, वैशाली सेतवाल यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
वाढदिवसाचे औचित्य साधून गरजूंना मायेची ऊब
आमदार सावकारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिष्ठा मंडळातर्फे शहरातील नाहाटा महाविद्यालय चौफुलीजवळ, अष्टभूजा मंदिराजवळ तसेच रेल्वे स्थानक परिसरात उघड्यावर वास्तव्यास असलेल्या शंभरावर गरजूंना शाल, चिवडा व बिस्कीटाचे वाटप आमदार सावकारे व रजनी सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले.




