भुसावळात आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर : 36 दात्यांचे रक्तदान
भुसावळ (12 डिसेंबर 2024) : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी व इनरव्हील क्लब ऑफ़ भुसावळ रेलसिटीच्या संयुक्त विद्यमाने आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त अष्टभूजा मंदिराजवळ बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 36 दात्यांनी यावेळी रक्तदान केले.
रोटरी क्लबचे सचिव अनिल सहानी व सदस्य उमेश घुले, पुरुषोत्तम पटेल, सुधीर पाचपांडे, अनिकेत पाटिल, योगेश चौधरी आदींनी रक्तदानात सहभाग नोंदवला. प्रोजेक्ट चेअरमन नितीन धांडे, रोटरी रेलसिटीचे अध्यक्ष अॅड.विशाल शाह, इनरव्हील रेलसिटी अध्यक्षा मीनाक्षी धांडे, रोटरी रेलसिटी सचिव अनिल सहानी, क्लब सदस्य विकास पाचपांडे, देवा वाणी, महेंद्र मांडे व रोटरी रेलसिटी व इनरव्हील सदस्य उपस्थित होते.





