भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाची सायरा गवळी एम.ए.हिंदीमध्ये द्वितीय


भुसावळ (14 डिसेंबर 2024) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयातील हिंदी विभागातील सायरा मोहम्मद गवळी हिने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव एप्रिल-मे 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एम.ए. (द्वितीय वर्ष) हिंदी विषयात द्वितीय क्रमांक पटकविला.

आपल्या शैक्षणिक क्षेत्रात अप्रतिम यश मिळवून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातल्याने तिचा महाविद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला. श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा पदमा मोतीलाल कोटेचा, सचिव संजय सुराणा, सदस्य दीपेश जी.कोटेचा, सदस्य रूपेश जैन, संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी कौतुक केले. सायराच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे पद्मा कोटेचा म्हणाल्या.

महाविद्यालयतील पदाधिकारी यांनी सायरा गवळीच्या घरी जात तिच्यासह आई-वडिलांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.जान्हवी तळेगावकर, उपप्राचार्य प्रा. डॉ.एस.के.अग्रवाल, आयक्यूसी समन्वयक प्रा.डॉ.जे.व्ही.धनवीज, हिंदी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.गिरीष कोळी, प्रा.जाकीर शेख, प्रा.हेमांगी कोळी उपस्थित होत्या.


कॉपी करू नका.