जळगावात वॉचमनच्या घरातून रोकड, स्वयंपाकाची भांडी लांबवली


जळगाव (14 डिसेंबर 2024) : घराच्या दरवजाचा कडीकोयंडा तोडुन चोरट्यांनी रोकड, एक मोबाईल आणि स्वयंपाकाचे भांडे असा सुमारे 5400 रुपयांचा मुद्देमाल वॉचमनच्या घरातून भामट्यांनी चोरुन नेला.प्लॉट नं. 36 विद्यानगर,सागरपार्क जवळ ही घटना गुरुवार 12 रोजी पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

किरण मानसिंग राठोड (36) यांच्यासह त्यांच्या पत्नी सविताबाई, मुलगी आरुर्षी असे सदस्य राहतात. ते मनिष मुनोत यांच्या अपार्टमेंटमधील खालच्या बाजुला राहतात. बुधवारी रात्री कुटुंबातील सदस्य झोपले होते. मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी राठोड यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडुन आत प्रवेश केला.

पिठाचे डबे व दाळीचे डबे उघडून चोरट्यांनी मुद्देमालाचा शोध घेतला. सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता. दाळीच्या डब्यात ठेवलेले मजुरीचे सुमारे 2100 रुपये रोख, दोन हजार किमतीचा मोबाईल तसेच 1300 रुपये किमतीचे घरातील स्वयंपाकाची भांडी घेऊन चोरटे पसार झाले. या प्रकरणी तक्रारीनुसार गुरुवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.