….15 मिनिटात भाजपा आम्हीही केली असती रिकामी ! : संजय राऊत


वृत्तसंस्था । मुंबई (14 डिसेंबर 2024) : महायुतीकडे पोलीस, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा यंत्रणा आहेत मात्र याच यंत्रणा आमच्याकडे राहिल्या असत्या तर संपूर्ण भाजपा आम्ही 15 मिनिटांत रिकामा केला असता, असा धक्कादायक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे काही आमदार, नेते महायुतीच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना खासदार संजय राऊत यांना छेडल्यानंतर ते बोलत होते.

एकनाथ शिंदेंना कुणीही विचारत नाही
संजय राऊत यांना एकनाथ शिंदे नाराज असल्याबाबत विचारणा केली असता त्यांना कोण विचारत आहे. एकनाथ शिंदे यांचा आनंद किंवा त्यांची नाराजी दिल्लीसाठी आता संपलेली आहे. हे सगळे कळसुत्री बाहुली आहेत. अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे आता गुलाम आहेत. गुलामांनी बलिदानाची तयारी ठेवली पाहिजे, ती यांच्याकडे नाही. ते डरपोक लोक आहेत, असे राऊत म्हणाले.


…तर पुन्हा 105 हुतात्मे देण्याची तयारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहे
बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, निकालाची मतमोजणी सुरू होताच अर्धे भाजपावाले देश सोडून पळून गेलेले असतील. यात अनेक मोठे नेते असू शकतात. या गोष्टी आम्हाला सांगू नका. आम्ही कुणालाही घाबरत नाही. पक्षासाठी आम्ही तुरुंगवास भोगले, मारामार्‍या केल्या आहेत, आता आम्ही सभ्य झालो आहोत. जोपर्यंत आम्ही सभ्य आहोत, तोपर्यंत आम्ही सभ्यतेने राहू. महाराष्ट्राच्या मूळावर येण्याचा प्रयत्न केला, तर पुन्हा 105 हुतात्मे देण्याची तयारी फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे आणि त्या 105 हुतात्म्यातील पहिला हुतात्मा संजय राऊत असेल, असेही राऊत म्हणाले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !