भुसावळात चाकूच्या धाकावर 62 हजारांचा ऐवज लूटला : तिकूटाविरोधात गुन्हा
Property worth Rs 62,000 looted at knifepoint in Bhusawal: Crime against Tikuta भुसावळ (15 डिसेंबर 2024) : शहरातील सतारा भागातील नारायण कॉम्पलेक्स जवळील पालिकेच्या शौचालयात तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवित सुनील यशवंत पाटील यांच्याजवळील 45 हजार रुपये रोख व मोबाईल असा 62 हजारांचा ऐवज लुटला. ही घटना 2 डिसेंबरला सकाळी 10 वाजता घडली. शहर पोलिसात 13 डिसेंबरला 11 दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे लूट प्रकरण
शहरातील जुना सतारा भागातील मरीमाता मंदिरामागील सुनील यशवंत पाटील यांना तीन जणांनी नारायण कॉम्पलेक्स जवळील पालिकेच्या शौचालयात नेत त्यांना चाकूचा धाक दाखविला. यावेळी दोन जणांनी त्यांचे हात पकडले तर एकाने चाकू दाखवित आरडा-ओरड केल्यास चाकू मारून देईल, अशी धमकी दिली. चोरट्यांनी पाटील यांच्या खिश्यातील 45 हजारांची रोकड व मोबाईल असा 62 हजारांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी पाटील यांनी शुक्रवार,ख 13 रोजी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तीन अनोळखी व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. शहरचे पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलीसउपनिरीक्षक इकबाल अली इब्राहीम अली सैय्यद हे पुढील तपास करीत आहे.