राज्याच्या गतीशील कारभाराला सुरूवात : दोन दिवसात खाते वाटप ; मुख्यमंत्री


नागपूर (15 डिसेंबर 2024) : हिवाळी अधिवेशनासोबत थंडीदेखील असल्याने या अधिवेशनात आम्ही जनतेला ऊब आणि ऊर्जा मिळेल अशा पद्धतीने काम आम्ही निश्चित करू. मंत्री मंडळाचा विस्तार झाल्याने आता आम्ही गतीशील कारभार सुरू केला आहे. येत्या दोन दिवसांत आम्ही खातेवाटप करू. चांगले कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महायुती सरकारच्या मंत्री मंडळ विस्तारानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला.

आमचे सरकार संविधानाचा आदर करणारे
देवेंद्र फडणवीस यांनी परभणीच्या मुद्द्यावर सांगितले की, एखाद्या मनोरुग्णाच्या कृतींवर असंवेधानिक पद्धतीने उद्रेक करणे हे योग्य नाही. आपले सरकार संविधानाचे आदर करणारे सरकार आहे. बीड जिल्ह्यातील घटना अतिशय विध्वंस प्रकारची आहे. सरपंचाची जी हत्या झाली त्यात आपण अनेकांना अटक केली असून केस सीआयडीला दिली आहे. या प्रकरणातील सगळी चौकाशी आपण करणार आहोत. कुठल्याच आरोपीला सोडले जाणार नाही. या महाराष्ट्रात अशा घटना गांभीर्याने घेतले जातील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिला.


एव्हरी  व्होट फॉर महाराष्ट्र
फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षांनी आम्हाला एक पत्र दिले आहे. मागच्याच वर्षीचे पत्र फक्त त्यात ईव्हीएमचा मुद्दा त्यात दिला आहे म्हणून त्यांनी हिवाळी अधिवेशनाला चुकून पावसाळी अधिवेशन म्हणाले होते. कारण जुनेच पत्र त्यांनी दिले आहे. आम्ही निश्चितपणे त्यांच्या पत्राचे उत्तर आम्ही देऊ. ईव्हीएमबद्दल देखील आम्ही त्यांना उत्तर देऊ. या ईव्हीएमचा अर्थ असा आहे एव्हरी व्होट फॉर महाराष्ट्र.

दोन दिवसात खाते वाटप : अजित पवार
विरोधी पक्ष सातत्याने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याची टीका अजित पवारांनी केली. येत्या 2 ते 3 दिवसात खातेवाटप होणार असल्याची माहिती देखील यावेळी अजित पवारांनी दिली आहे.

मी नाराज असल्याच्या केवळ चर्चा : टीम म्हणून काम करणार : शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. गेल्या काही दिवसात तुम्हीच मंत्रिमंडळ विस्तार करत होतात असा टोला देखील पत्रकारांना शिंदेंनी लगावला आहे. गेले अडीच वर्ष आम्ही टीम म्हणून काम केले. फडणवीस यांना असलेला अनुभव आम्हाला कामी आला आणि अजितदादा नंतर आले आणि आम्ही टीम म्हणून काम केले. आम्ही जे म्हणालो त्यावर जनतेने देखील विश्वास दाखवला. विदर्भात हे अधिवेशन होत आहे आणि विदर्भाला न्याय देण्यासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !