गुरुच्या मार्गदर्शनावर मार्गक्रमण करणाराच खरा शिष्य : गोपाल चैतन्यदासजी
फैजपूर (16 डिसेंबर 2024) : गुरुंच्या मार्गदर्शन सुपंथवर मार्गक्रमण करणारा तोच खरा सतशिष्य असतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय संत समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोपाल चैतन्यदासजी महाराज (वृंदावन धाम पाल) यांनी येथे केले. शहरातील सतपंथ मंदिराचे 11 वे गादीपती ब्रम्हलीन आचार्य स.गु.जगन्नाथजी महाराजांचा अखंडीत 23 वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तीमतय भक्तीमय जल्लोषात विविध उपक्रमांनी साजरा झाला.
विविध उपक्रम
सतपंथ मंदिराचे 11 वे गादीपती ब्रम्हलीन आचार्य स.गु.जगन्नाथ महाराजांचा अखंडीत 23 वा पुण्यतिथी सोहळा विविध उपक्रमांनी साजरा झाला. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय संत समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोपाल चैतन्यदासजी महाराज (वृंदावन धाम, पाल) होते. 13 रोजी सतपंथ मंदिरात महापूजा अनुष्ठान, रात्री सत्संग, सामूहिक नाम संकीर्तन झाले. 14 रोजी सकाळी सतपंथ मंदिर ते शहरातील मुख्य मार्गावरून आचार्य जगन्नाथ जी महाराज यांच्या तैलचित्राची सजविलेल्या गाडीतून भव्य-दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा मार्गस्थ होत रोझोदा रस्त्यावरील समाधीस्थळी आल्यानंतर तिचा समारोप झाला व धर्म सभेला प्रारंभ करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
धर्मसभा मंचावर मंदिर गादीपती सतपंथरत्न महामंडलेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज, अखिल भारतीय संत समिती प्रदेशाध्यक्ष गोपाल चैतन्यदासजी महाराज (पाल), मानेकर बाबा शास्त्री (सावदा), योगी दत्तनाथ महाराज )(शिंदखेडा), हभप रवींद्र हरणे महाराज (मुक्ताईनगर), शास्त्री अनंतपारक्षदासजी गुरुकुल (सावदा), श्याम चैतन्य दासजी (जामनेर), हभप रवींद्र महाले (फुलंब्री), गेंदालाल महाराज (भुसावळ), आचार्य सचिन पाटील (निष्कलंकीधाम वढोदा), पवनदासजी महाराज (फैजपूर), हभप प्रवीणदासजी महाराज, हभप नितीन महाराज, हभप दत्तात्रय महाराज, दीपक भगत, श्रीकृष्ण महाराज संतोष महाराज, प्रसन्न महाराज, शकुंतला दीदीसह सतपंथ मुखी, आदी संत मंडळी विराजमान होती. नवनिर्वाचित आमदार अमोल जावळे यांचाही भगवी टोपी, शाल व पुष्पमाळा देवून सन्माननीत करण्यात आले. सूत्रसंचालन शैलेश महाजन तर आभार महामंडलेश्वर जनार्दन हरिजी यांनी मानले. संजीवनी रक्त पेढीतर्फे रक्तदान शिबिरात 22 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यांचाही सहभाग व परिश्रम
गोदावरी फाउंडेशन जळगाव संचालिका डॉ.केतकी पाटील, माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघूळदे, मधुकर नारखेडे, रवींद्र होले, प्रा.राजेंद्रसिह राजपूतसह विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवक, महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यशस्वीतेसाठी कडू मुखी, युवराज किरंगे, राजेंद्र किरंगे, प्रकाश ठोबरे, हेरंभ भारबे, भरत भंगाळे, किशोर भारबे, नेमीदास भारंबे, रोहिदास भिरूड, यादव चौधरी, पियुष भारंबे, मयूर भारंबे, उत्कर्ष भारंबे, मनोज होले, तेजपाल चौधरी, चेतन चौधरी, नितीन इंगळेसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.