धुळे एसीबीची मोठी कारवाई : दहा लाखांची लाच मागणार्‍या मालेगावातील नगर भूमापन अधिकार्‍याला अटक


Dhule ACB takes major action : City survey officer arrested for demanding bribe of Rs 10 lakh धुळे (16 डिसेंबर 2024) : भूखंडावरील पोटहिस्सा मोजणी करून सर्व सहधारकांच्या नावे स्वतंत्र मिळकत पत्रिका करून देण्यासाठी दहा लाखांची लाच मागणी करणार्‍या नगर भूमापन अधिकार्‍याला धुळे एसीबीने अटक केली तर खाजगी पंटर मात्र पसार झाला. पंढरीनाथ काळू चौधरी (50, रा.राजकमल रो.हाऊस नं.5, ओमकार नगर, एन.आर.एस.टी.वर्कशॉप, पेठरोड, नाशिक) असे अटकेतील नगर भूमापन अधिकार्‍याचे नाव आहे तर अन्सारी मेहमूद अहमद मोहम्मद शफी (72, रा.एम.एच .बी.कॉलनी, हजार खोली, मालेगाव) हा मात्र पसार झाला आहे.

असे आहे लाच प्रकरण
47 वर्षीय तक्रारदार व इतर सहधारक यांच्या नावे मौजे इस्लामपूरा, मालेगाव येथे भूखंड आहे. त्याची पोटहिस्सा मोजणी करून सर्व सहधारकांचे नावे स्वतंत्र मिळकत पत्रिका करून देण्यासाठी आरोपी पंढरीनाथ चौधरी याने 21 व 22 ऑक्टोबर रोजी दहा हजारांची लाच मागितली व खाजगी पंटर अन्सारी मेहमूद याने लाच द्यावी म्हणून प्रोत्साहन दिले.

अधिकारी जाळ्यात मात्र पंटर पसार
संशयीतांना लाच सापळ्याचा संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणीचा अहवाल येताच सोमवारी संशयीत तथा नगर भूमापन अधिकारी पंढरीनाथ काळू चौधरी (50, रा.राजकमल रो.हाऊस नं.5, ओमकार नगर, एन.आर.एस.टी.वर्कशॉप, पेठरोड, नाशिक) यास अटक करण्यात आली तर पंटर मात्र चर्तुभूज झाला.

यांनी केली कारवाई
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, हवालदार राजन कदम, हवालदार पावरा, सुधीर मोरे, रामदास बारेला यांनी कारवाई केली.


कॉपी करू नका.