पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू : परभणीतील घटनेनंतर धुळ्यात नाशिक-शहादा बसवर दगडफेक
Stones pelted on Nashik-Shahada bus in Dhule after Parbhani incident धुळे (17 डिसेंबर 2024) : परभणी घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू ओढवल्याचे पडसाद राज्यासह धुळ्यातही उमटले आहे. 10 ते 12 जणांच्या जमावाने नाशिक-शहादा बसवर दगड भिरकावल्याने बसच्या काचा फुटल्या मात्र सुदैवाने प्रवासी जखमी झाले नाहीत. ही घटना सोमवार, 15 रोजी घडली.
काय घडले नेमके ?
परभणीत तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यूचे पडसाद राज्यात उमटत आहेत. सोमवारी नाशिक आगाराची बस (एम.एच.01 जे.डब्ल्यू 0884) नाशिक-शहादा बस धुळ्यात येत असताना दसरा मैदान चौकात बससमोर सुमारे 10 ते 12 जणांच्या जमावाने बसवर दगड भिरकावल्याने दर्शनी भागाच्या काचा फुटल्या. संशयीताने तोंडाला रूमालाने झाकल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. सुदैवाने यात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. खिडकीची काच फुटून प्रवासी सीटवर पडली.
चेंबूर, घाटकोपर, दहिसरमध्ये धरपकड
परभणीमधील घटनेचे पडसाद मुंबईत उमटले, चेंबूर, घाटकोपरसह ठिकठिकाणी आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरून बंदमध्ये सहभागी झाले होते. चेंबूरमधील आंदोलकांना आंबेडकरी अनुयायांनी ताब्यात घेतले. तसेच दहिसरमध्ये रिपाइं आठवले पक्षातर्फे मुंबई बंदची घोषणा करून दुकाने बंद ठेवण्यात आली. मृत सूर्यवंशी यांच्या कुटुंबास आर्थिक मदत आणि सरकारी नोकरीची मागणी केली.