भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये लोकमान्य टिळकांना अभिवादन
भुसावळ (29 जुलै 2025) : शहरातील कोलते फाऊंडेशन संचलित ‘द वर्ल्ड स्कूल’मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
मुख्याध्यापिका पेट्रिशा हॅसेट यांनी टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. विद्यार्थ्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या घोषणांनी वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पर्यवेक्षिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





